चाळीसगावच्या विकासासाठी रोटरी मिल्क सिटी उपक्रम

0

चाळीसगाव । चाळीसगावचा विकास करण्याच्या व फेस्टीवलच्या माध्यमातून उद्योग उभारण्याच्या संकल्पनेतून येथे 1 ते 7 फेबु्रवारी दरम्यान रोटरी मिल्क सिटी फेस्टीवल हे उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वयंदीप अपंग बहुउद्देशीय विकास संस्थने समाजाचे देणे लागतो या भावनेतून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांनी पेस्टीवलचा पहिला स्टॉल उभारला. स्टॉलच्या उद्घाटन नुकतेच स्वयंदीप संस्थेच्या दिव्यांग भगिनींच्या हस्ते करण्यात आले.

शहराचे होणार सुशोभीकरण
व्यासपीठावर रोटरीच्या अध्यक्षा मेघा बक्षी, कार्याध्यक्ष लालचंद बजाज, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संतोष मालपुरे, प्रा. चंद्रकांत ठोबंरे, सुभाष करवा, अ‍ॅड. ओमप्रकाश शर्मा आदी उपस्थित होते. या उत्सवाच्या माध्यमातून लवकरच चाळीगावातील मुख्य रस्ते शुभोभित शहर सुंदर करण्याचा प्रयत्न असून यासाठी रोटरी कल्ब ऑफ मिल्क सिटीचे सर्व सदस्य मदत करणार आहेत. उद्योजकांसाठी पेैस्टीवल म्हणजे एक पर्वणीच असून यात विविध नाविण्यपुर्ण स्टॉल असणार आहे, त्याच बरोबर विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल मधून एकाच दालनात पहायला व खरेदी करायला मिळणार आहेत.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
मनोरंजनासाठी विविध खेळ, पाळण्यांसाठी भव्य व आकर्षक दुकाने असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सोनवणे यांनी तर सुत्रसंचालन दिपक पाटील यांनी केले. आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विमल चौधरी, सुनिता जाधव, बालाप्रसाद राणा, आधार महाले, देविदास दायमा, भरत दायमा यांच्यासह रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले. चाळीसगाव रोटरी मिल्क सिटीच्या माध्यमातून शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.