चाळीसगावचे तहसलीदार कैलास देवरे उत्कृष्ट अधिकारी 

0

चाळीसगाव : विभागीय आयुक्तालयाच्या नियोजन सभागृहात विभागीय महसूल दिनानिमीत्त चाळीसगावचे तत्कालीन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील, पाचोर्‍याचे त्तकालीन प्रातांधिकारी गणेश मिसाळ तर चाळीसगावचे तहसिलदार कैलास देवरे यांच्यासह इतर अधिकार्‍यांचा गौरव नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अपर आयुक्त जे.टी. पाटील, उपायुक्त डॉ. संजय कोलते, गावडे, मित्रगोत्री, खिलारे, उपसंचालक (नगर प्रशासन) कुलकर्णी आदी उपस्थित होते. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करतांना कामाचे स्वरुप आता व्यापक झाले आहे. त्यामुळे पुरस्कार स्विकारतांना आपल्या चांगल्या कामांव्दारे आपली ओळख निर्माण करा असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.

यावेळी सन 2014-15 आणि सन 2015-16 या दोन वषार्ंतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांचा डवले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डवले म्हणाले, गेली दोन वर्ष विविध नैसर्गिक परिस्थितीमुळे आपण ऑगस्ट महिन्यात हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही. कारण आपले प्राधान्य पूरपरिस्थिती नियंत्रण, निवडणुका आणि अन्य शासकीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणी हे होते असे सांगितले. यावेळी आपण दोन्ही वर्षातील उत्कृष्ट अधिकार्‍यांना गौरविण्यात आले. प्रत्येक अधिकार्‍यांनी शासकीय योजनांची चांगली अंमलबजावणी केली. नागरिकांना वेळेवर चांगली सेवा दिली तर त्या कामाची आपोआप पोच मिळत असते. महसूल विभागाच्या कामांचा व्याप वाढला असला तरी हे व्यापक स्वरुपाचे काम आहे. जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजनांची अंमलबजावणी असेल अथवा महाराजस्व अभियान तसेच आता सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी, अधिकार्‍यांनी उत्कृष्ट काम केले तर त्याचे कौतुक निश्चितच होते, असे ते म्हणाले. अपर आयुक्त पाटील यांनी काम करताना सांघिक भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. सुरुवातीला उपायुक्त डॉ. कोलते यांनी प्रास्ताविक केले. सत्कारार्थींच्या वतीने महेश पाटील, मनोज घोडे पाटील, नितीन पाटील, मीनाक्षी राठोड, अमित पवार, एस.डी. पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.