चाळीसगावचे डॉ.विनोद कोतकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

0

चाळीसगाव- अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनात चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव व आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर यांना समाजरत्न पुरस्कार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते देण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात आई फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणार्‍या समाजोपयोगी कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार डॉ.विनोद कोतकर यांना देण्यात आला. प्रसंगी महाअधिवेशनाचे अध्यक्ष कैलास वाणी, अनिल चितोडकर, स्वागताध्यक्ष आर.एल.वाणी, शामकांत शेंडे, राजेश कोठावदे, राजेंद्र पाचपुते, गजानन मालपुरे,गोविंद शिरोळे,शशिकांत येवले, शाम कोतकर, शशिकांत वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.