चार हजारांची लाच भोवली : पिंपळगाव हरेश्वरचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Bribe of 4000: Bribery Constable of Pimpalgawar Hareshwar Police Station in Jalgaon ACB’s net  जळगाव : तक्रारदार शेतकर्‍याची बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा पोलिस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. राकेश खोंडे असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे.

चार हजारांची लाच भोवली
पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील तक्रादार शेतकर्‍याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकर्‍याने तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वरातील पोलिस हवालदार राकेश खोंडे यांनी पाच हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराकडे चार हजार असल्याने त्यावर तडजोड झाली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची मंगळवारी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील एका चौकात तक्रारदाराला बोलावण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. एका चहाच्या टपरी व्यावसायीकाकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी पाटील नामक चहा व्यावसायीकाला व नंतर आरोपी हवालदार राकेश खोंडे यास अटक केली. विशेष म्हणजे आरोपी हवालदार हा रजेवर असल्याची माहिती आहे.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.