चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव- प्रशासकीय, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यामधील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी बदल्यांचे आदेश काढले आहे.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंदे यांची बदली नियंत्रण कक्षात झाली. रामकृष्ण पवार यांची मुक्ताईनगर येथे, धरणगावचे जयपाल हिरे यांची अमळनेर पोलीस ठाण्यात, तर नियंत्रण कक्षातील अंबादास मोरे यांची धरणगाव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.