जम्मू-काश्मिरात चार दहशतवादी कंठस्नानी !

0

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज रविवारी पाहटे चकमक उडाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांना कंठस्नानी घालण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान अद्याप परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Copy