Private Advt

चार जिल्हा बँकांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर

जळगाव – थकीत कर्जाची वसुली करणे, आर्थिक स्थिती मुळ पदावर आणणे, व्यवसायात वाढ करणे, संचित तोटा कमी करणे या उपाययोजना करण्यासाठी चार जिल्हा बँकावर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक आणि प्रशासक मंडळास पुरेसा कालावधी मिळावा याकरीता विशेष बाब म्हणून नाशिक, सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा या चार जिल्हा बँकांची निवडणूक दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश सहकार खात्याने जारी केला आहे.