चारित्र्यावर संशय; विवाहितेचा छळ

0

धुळे। तालुक्यातील मोराणे येथील माहेर व सिन्नर जि.नाशिक येथे सासर असलेल्या 27 वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी उपाशी ठेऊन मारहाण, शिवीगाळ करुन घरातून हाकलून दिले.

तसेच जीवेठार मारण्याची धमकी देऊन माहेरी येऊन तिच्या आई-वडील व भावांना शिवीगाळ, दमदाटी करुन नांदण्यास नकार देऊन शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहितेने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती विजय महादू पवार, सासू इंदूबाई महादू पवार, सासरे महादू राजाराम पवार, जेठ तुषार महादू पवार, नणंद सारिका नितीन ठाकरे रा.सिन्नर, जि.नाशिक या 5 जणांविरुध्द भादंवि कलम 498 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.