चाचणी यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत कोरोना लस उपलब्ध होणार

0

पुणे:- देशासह जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीचे संशोधन सुरु आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी या लसीच्या संशोधनाविषयी महत्वपूर्ण माहिती सांगितली. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आम्ही लसीच्या चाचण्यांवर काम करत आहोत. सुरक्षा आणि त्याची परिणामकारकता यशस्वी झाल्यानंतरच सप्टेंबर- ऑक्टोबर पर्यंत कोरोनावरील लस येऊ शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच क्लिनिकल चाचणी यशस्वी झाल्यास पुरेसे डोस उपलब्ध करण्यासाठी लसीचे उत्पादन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. पहिल्या सहा महिन्यासाठी सुमारे 50 लाख लसीचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठरवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी सोबत लस प्रकल्पात आम्ही भागीदारी केली आहे. तेथील डॉ. हिल यांच्यासह आमच्या तज्ज्ञाचे पथक करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच लसीच्या चाचण्यामध्ये आवश्यक सुरक्षा आणि परिणामकारकता तपासून ती लस येऊ शकते. पुढील दोन आठवड्याच्या कालावधीत आम्ही या लसीची भारतात चाचणी सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पुनावाला यांनी दिली.

Copy