Private Advt

चाकूच्या धाकावर रोकडसह मोबाईल लांबवले : पिंप्राळ्यातील घटना

जळगाव : शहरातील पिंप्राळा भागात असलेल्या सोमानी गल्लीत चाकूचा धाक दाखवत दुकानदाराकडून दोन मोबाईल आणि आठशे रुपयांची रोकड लांबवण्यात आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
संदीप शरद सोमाणी (41, सोमाणी गल्ली, पिंप्राळा, जळगाव) हे शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानावर असताना अक्षय बन्सीलाल धोबी उर्फ बाबू, जय सुतार, गोलू पूर्ण (नाव माहित नाही) अशांनी येऊन चाकूचा धाक दाखवत शिविगाळ केली व तुझ्याकडे काय आहे ते लवकर गल्ल्यातून काढ असे बोलून गल्ल्यातून 800 रुपये काढले व फिर्यादीच्या हातातून दोन मोबाईल जबरी हिसकावून पसार झाले. याप्रकरणी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास संदीप सोमाणी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.