चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटणार्‍या तिघांची कारागृहात रवानगी

0

तालुका पोलीस ठाण्यात आहेत गुन्हा दाखल

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाजवळ निहाल अहमद इप्तेखार अहमद शेख (40, रा.धुळे) या ट्रक चालकास तिघांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन 1500 रुपयांची रोकड लांबविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची बुधवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

धुळे येथील ट्रकचालक हिनाल अहमद इप्तेखार हे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेवून जळगावाला येत होते. सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जळगावात पोहचले असता, गुजराल पेट्रोलपंपाजवळ तीन संशयितांनी ट्रकचालक इप्तेखार यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. व खिशातून रोकड 1500 रुपयांची रोकड काढून दोघेही पसार झाले होते. तर एकास ट्रकचालकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी भिमराव मुकेश पवार वय 20 रा. इंद्रप्रस्थ नगर, दुर्गेश आत्माराम सन्यास वय 19 रा. लक्ष्मीनगर, गेंदालाल मिल व पवन संजय वानखेडे वय 26 रा. सत्यमपार्क या तिनही संशयितांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर 28 ऑक्टोंबर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी पुन्हा तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांची कारागृहात रवानगी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण करीत आहेत.