चाकणमध्ये सव्वा दहा लाखांचा गुटखा जप्त

0

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

चाकण : वेगवेगळ्या टेम्पोमधून गुटखा घेऊन जाणार्‍या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 10 लाख 28 हजार 400 रुपये किमतीचा गुटखा आणि तीन वाहने असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण येथे केली. शिवा पुरुषोत्तम तुप्तेवार (रा. सॅफरॉन सिटी, आंबेठाण चौक, चाकण), उमाकांत कोंडीबा वाघमारे (रा. कुरुळी, गायकवाड वस्ती, चाकण), ओमप्रकाश विरमाराम बिश्‍नोई (रा. शिवकृपा कॉम्प्लेक्स, चाकण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस कर्मचारी प्रदीप शेलार, रमेश भिसे, राजन महाडिक, डी.डी.भुजबळ, प्रसाद जंगीलवाड, ए.डी.गारगोटे, एस.जी.मगर, डी.आर. धस, एस.डी.दिघे, बाळासाहेब सूर्यवंशी, बी.के.दौंडकर, टी.डी.घुगे, आर.डी.बांबळे, प्रदीप गुट्टे, पी.एच.फुंदे यांच्या पथकाने केली.

चाकण हद्दीत पोलिसांची गस्त

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ व गुटखा विक्रीच्या गुन्ह्यास प्रतिबंध होण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस चाकण हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना चाकण येथे आरोपी शिवा तुप्तेवार हुंदाई कार (एम एच 14 / जी एस 2822), उमाकांत वाघमारे छोटा हत्ती (एम एच 14 / ई एस 2985), ओमप्रकाश विश्‍नोई पियागो (एम एच 12 / क्यू ई 2027) हे तिघेजण जाताना आढळून आले. त्यांच्या वाहनांबाबत संशय आल्याने त्यांना थांबवून वाहनांची झडती घेतली असता वाहनांमध्ये विमल पान मसाला, व्ही 1 तंबाखू, महेक सिल्वर मसाला, आर.एम.डी., एम 1 जर्दा यांसारख्या 10 लाख 28 हजार 400 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. यावरून तिघांना अटक करून तीन वाहने देखील जप्त करण्यात आली. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy