Private Advt

चाकडूतील अल्पवयीन पीडीता अत्याचारातून गरोदर : नैराश्यातून केली आत्महत्या

मावस भावानेच अत्याचार केल्याचे उघड : आरोपीला पोलिसांनी केली अटक

शिरपूर : नात्यातील मावस भावाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व त्यातून ती गर्भवती राहिल्याने तिने आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला झाला आहे. अत्याचार प्रकरणी सोमनाथ पावरा यास पोलिसांनी अटक केली असून त्याची पोलिस कोठडीत रवागनी करण्यात आली.

विषारी औषध सेवन करीत केली आत्महत्या
शिरपूर तालुक्यातील चाकडू गावातील 16 वर्षीय मुलीने बुधवार, दि 13 रोजी विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली होती. शवच्छेदनात मृत मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. पोलिस अधिकारी सुरेश शिरसाठ व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक संदीप पाटील, भिकाजी पाटील व कर्मचारी बाहेरुन तपास सुरू करीत मयताच्या मोबाईलमधील क्रमांकावरून सोमनाथ भोज्या पावरा (रा. टेकवाडे, ता.शिरपूर) हा संपर्कात असल्याचे स्पष्ट होताच त्याची चौकशी करण्यात आली. आरोपीने पीडीतेवर अत्याचार केला व त्यातून ती गरोदर राहिली होती व प्रकार कुटूंबियांच्या लक्षात आल्यानंतर पीडीता नैराश्यात असतानाच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले. शिरपुर तालुका पोलिस ठाण्यात बलात्कार, आत्महत्येला प्रवृत्त करणे बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.