चांदोरकर प्रतिष्ठान आणि दादर माटुंगा केंद्रातर्फे सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन

0

जळगाव : चांदोरकर प्रतिष्ठान अन् दादर माटुंगा केंद्रातर्फे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्ययांसाठी आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा अायाेजित करण्यात अाली अाहे. या स्पर्धेची पहिली फेरी १४ रोजी सकाळी ९ वाजता मू. जे. महाविद्यालयात होणार आहे.

या स्पर्धेची राज्यस्तरीय अंतिम फेरी मुंबईला घेण्यात येते. स्पर्धेचे उद््घाटन केसीईचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या हस्ते होईल. या वेळी राजा बापट, रवींद्र आवटी, अविराज तायडे हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी प्रा. हेमंत पाटील, स्वानंद देशमुख, जुईली कलभंडे, मयूर पाटील, वरूण देशपांडे, अरविंद देशपांडे, अनघा देशपांडे, दीपिका चांदोरकर आदी सहकार्य करीत आहेत. अधिक माहितीसाठी मयूर पाटील, स्वानंद पाटील याच्याशी संपर्क करावा, असे प्रतिष्ठानने कळवले आहे.

Copy