Private Advt

चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व संगित महोत्सावाची द्विदशकपुर्ती

 जळगाव – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतीक केंद्र उदयपूर यांच्यावतीने दि. 6 ते 9 जानेवारी रोजी पर्यंत चार दिवसीय संगित महोत्सावाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर यांनी पत्रकारपरिषदेत दिली. मात्र नक्की कोणत्या ठिकाणी हा महोत्सव होणार आहे या बाबत त्यांच्या कडून कोणतीही माहिती देण्यात येणार आहे. बालगंधर्व नाट्यगृहाचे 6 तारखेपर्यंत नूतनीकरण होईल कि नाही याची शाश्वती नसल्याने ठिकाणा बाबत कोणतीही निश्चितता नाही एकतर ते बालगंधर्व नाट्यगृहात होईल किंवा छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात होईल असे यावेळी दीपक चांदोरकर यांनी सांगितले.

यंदा प्रतिष्ठानची द्विदशकापुर्ती असल्याने या महोत्साचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि. 6 जानेवारी रोजी होणार असून यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर मुकेशकुमार सिंग, युनियन बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर गिरीजा भूषण मिश्रा, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे डेप्युटी जनरल अंजली भावे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लि. चे झोनल मॅनेजर श्री. अग्रवाल उपस्थित होते. महोत्साच्या पहिल्या दिवसाच्या सत्रात अहमदाबादच्या मानसी मोदी व मानसी करानी या कथ्थक व भरतनाट्यमची जुगलबंदी सादर करणार आहे. त्यानंतर दुसर्या सत्रात हर्मोनिका व माऊथ ऑर्गन वादक शुभ्रनिल सरकार हा शास्त्रीय संगीत वाजविणार आहे. दि. 7 रोजी मर्मबांधतली ठेव ही नाट्य संगितावर आधिरीत श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, वेदश्री ओक हे सादरीकरण करणार आहे. दि. 8 रोजी कानपूरचे धुप्रद गायक पं. विनोदकुमार द्विवेदी व त्यांचा मुलगा आयुष द्विवेदी हे धूपद गायन तर दुसर्या सत्रात कोलकत्ता येथील तबला वादक पं. कुमार बोस व त्यांचा शिष्य कुणाल पाटील हे तबला व पखवाज वादानाची जुगलबंदी सादर करणार आहे. तसेच दि. 9 रोजी आश्वासक व चतुरस्त्र गायिका स्निती मिश्रा यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार असून संगित महोत्सवाचा समारोप कोकन कन्या बँडचे संगितकार रवीराज कोलथरकरांनी संगित बद्ध केलेले संगीतांचे सादरीकरण करणार आहे. या महोत्साचे सूत्रसंचलन दीप्ती भागवत या करणा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला अर्पणा भट कासार, दीपीका चांदोरकर आदी उपस्थित होते.