चहार्डी येथे राज्यस्तरीय डॉज बॉल स्पर्धेचे आयोजन

0

चोपडा । जळगाव येथील जिल्हा डॉज बॉल असोसिएशन व तालुक्यातील चहार्डी येथे कै.श्यामराव शिवराम पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व 15 जानेवारी रोजी कै.डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय साबज्युनियर व ज्युनियर डॉज बॉल अजिंक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिव अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी दिली. यावेळी संचालक जी.टी.पाटील, डॉ.अनिल पाटील, समन्वयक एम.एम. शिंदे, मुख्याध्यापक व्ही.आर.सोनवणे, क्रीडा शिक्षक विजय शिंदे, जितेंद्र महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेत सोळा संघ दाखल होणार
स्पर्धेत राज्यातून सब ज्युनिअर आणि ज्युनिअरसाठी आठ-आठ असे एकत्रित सोळा संघ दाखल होणार आहेत. उद्घाटन 14 रोजी सायंकाळी 5.00 वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे, प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, डॉज बॉल जिल्हा असोसिएशन अध्यक्ष डॉ.हनुमंत पाटील, चोपडा येथील प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, डी.वाय.एस.पी. सदाशिव वाघमारे, डॉ.नारायण खडके(शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त), जे.बी. राजपूत, राजेश जाधव (सचिव जिल्हा डॉज बॉल असोसिएशन) हे असणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चहार्डी येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय प्रशासन सज्ज झाले आहे