चव्हाण यांचे विविध कामांसाठी निवेदन

0

जळगाव। महानगरपालिका अंतर्गत शहरात 10 कोटी व 3.75 कोटींची कामे लवकर सुरूवात होणार असून यासाठी शहरातील विविध विकास कामे होणार आहे. या विकास कामांमध्ये प्रभाग क्र. 29 चा समावेश करण्यात यावा यासाठी नगरसेवक पृथ्विराज सोनवणे आणि ज्योती चव्हाण यांनी नुकतेच महापौर यांना निवेदन देवून विनंती केली आहे.

अनेक कामे प्रलंबित
निवेदना म्हटले आहे की, प्रभाग 29मध्ये अनेक गटारीव स्लॅब, कन्व्हरटरची कामे प्रलंबित आहेत. पालिकेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात असा भेदभाव नसून एकसमान कामे करण्यास मुभा देणार असल्याचे आश्‍वासीत केले होते. त्यानुसार या प्रभागास निधी मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.