चरणमाळ घाटात भरधाव लक्झरी उलटली : चालकासह दिड वर्षीय बालिकेचा मृत्यू

Driver Along With 18 Month Old-Baby Dies In Charanmaghat Bus Accident नवापूर : नवापूरजवळील चरणमाळ घाटात खाजगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात 18 महिन्यांच्या बालिकेसह चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी 11 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने घडल्याचे सांगण्यात आले. अपघातात दहावर प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर नवापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अन्य किरकोळ जखमी अन्य वाहनाने आपापल्या गावाकडे परतले आहेत.

तीव्र वळणावर उलटली लक्झरी
पिंपळनेर शहराकडून सुरतकडे भरधाव वेगाने लक्झरी मुसळधार पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने उलटली. ही घटना शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी प्रवासी करीत होते. अपघातानंतर प्रवाशांसह लहान मुलांनी टाहो फोडला. 108 रुग्णवाहिकेला अपघातानंतर पाचारण करण्यात आले मात्र रात्रीचा अंधार त्यातच सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे बचाव कार्यात अडचणींचा सामना करावा लागला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीक, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार
तीव्र वळणावर ब्रेक न लागल्याने बस दरीत रस्त्यावर कोसळली. सर्व प्रवाशी झोपले असतानाच हा अपघात घडला. दोन 108 रुग्णवहिका एक खाजगी रूग्णवहिकेच्या नवापूर उपजिल्हा रुग्णालयात जखमींना हलवण्यात आले तर चालकाला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले मात्र त्याचा मृत्यू ओढवला होता. ही बस सटाण्याहून गुजरात राज्यातील जुनागड येथे जात असल्याची माहिती असून जखमींमध्ये काही मजुरांसह लहान मुलांचाही समावेश आहे.