चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मकता

0

मुंबई । राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या मागण्यांच्या सदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासदर्भात 14 रोजी झालेल्या बैठकीत बोलतांना केले.  राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत बैठक झाली . यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव विजय सतबिर सिंग, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्लर, सचिव बाजीराव जाधव, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासह राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने, खजिनदार आर.टी. सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.