चक्रीवादळ : आठ विशेष गाड्या रद्द

भुसावळ : चक्री वादळाच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने सतर्कता बाळगत आठ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या गाड्या झाल्या रद्द : कंसात गाडी सुरू होण्याची तारीख
गाडी क्रमांक 02037 पुरी-अजमेर विशेष गाडी (यात्रा आरंभ 24 मे), गाडी 02038 अजमेर-पुरी विशेष गाडी (यात्रा आरंभ 25 मे), गाडी क्रमांक 02145 लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी विशेष गाडी (यात्रा आरंभ 23 मे), गाडी क्रमांक 02146 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी (यात्रा आरंभ 25 मे), गाडी क्रमांक 02844 अहमदबाद-पुरी विशेष गाडी (यात्रा आरंभ 23 व 24 मे), गाडी क्रमांक 02843 पुरी-अहमदबाद विशेष गाडी (यात्रा आरंभ 25 मे व 27 मे), गाडी क्रमांक 02828 सुरत-पुरी विशेष गाडी (यात्रा आरंभ 25 मे), गाडी क्रमांक 08405 अहमदबाद -पुरी विशेष गाडी (यात्रा आरंभ 26 मे).