चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना ठिबक संचावर सूट देणार : श्रीराम पाटील

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्याला चक्रीवादळाने तडाखा दिल्याने जवळपास एक हजार हेक्टर शेत जमिनीवरील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आयएसआय ड्रीपवर श्रीराम उद्योगसमूहातर्फे 40 टक्के सूट देणार असल्याची घोषणा उद्योजक श्रीराम पाटील यांनी करीत नुकसानग्रस्त 230 घरांना किराणा किटदेखील देण्यात आल्याची माहिती श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी दिली. मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी श्रीराम पाटील यांनी सर्वपक्षीय राजकारण्यांनी राजकारण न करता, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर एकत्र येण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पत्रकार परीषदेत केले.

यांची होती उपस्थिती
भागवत पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, वसंता पाटील, पवन पाटील, विनायक पाटील, उचंदा पोलिस पाटील जितेंद्र पाटील, समाधान पाटील, देविदास पाटील, समाधान पाटील, नितेश राजे, शे.रशीद, मुंढोदे सरपंच सोपान सपकाळे, उपसरपंच सुलतान पठाण, पुनर्वसन समितीचे सदस्य जावजी धनगर, मेढोळदे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.