चंदू चव्हाण ११ मार्चला धुळ्यात परतणार

0

नवी दिल्ली । पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण शनिवारी धुळ्यात परतणार असून स्वत: संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः चंदूला घेऊन धुळ्यात आणणार आहेत. चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचा. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाला.

उपचारानंतर बरा होऊन गावी येणार
22 वर्षीय चंदूनं दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदूचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. 29 सप्टेंबरला नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला चंदू चव्हाणची 21 जानेवारीला पाकिस्ताननं सुटका केली होती. संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं होतं. यासाठी संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे यांनी विशेष प्रयत्न केले होते. भारतात परतल्यानंतर चंदूला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर चंदू उद्या आपल्या गावी परतणार आहे.