घर बांधण्यासाठी माहेरहुन दहा लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ

0

एरंडोल: नविन घराचे बांधकामासाठी माहेरून दहा लाख रूपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी शारीरीक व मानसिक छळ केल्याची तक्रार एरंडोल येथील माहेर असलेल्या पुनम रूषिकेष मानुधने या विवाहीतेने ११फेब्रुवारी रोजी केली आहे.

याबाबत एरंडोल पो.स्टे.सूञांनी दिलेली माहीती अशी की एरंडोल येथील माहेर असलेल्या पुनम यांचा पैठण जि. औरंगाबाद येथील डॉ.रूषीकेष मानुधने यांचेशी २७ नोव्हेंबर २०२० रोजी पुनर्विवाह झाला होता. घर बांधकामासाठी सासरच्या मंडळींनी पुनम यांना अपमानास्पद वागणूक देऊन शारीरीक व मानसिक छळ केला.
आरोपींमध्ये रूषिकेष मदनलाल मानुधने(पती),मानुधने हॉस्पीटल, कोर्ट रोड पैठण,जयश्री मदनलाल मानुधने(सासू),मदनलाल चुन्निलाल मानुधने(सासरा),अनिरूध्द मदनलाल मानुधने(जेठ),स्नेहा अनिरूध्द मानुधने(जेठाणी) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी एरंडोल पो.स्टे.ला भाग ५ गु.र.नं.१५/२१ भा. दं. वि.कलम ४९८(अ)३७७,४०६,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक द्नयानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल छाया खैरे पुढील तपास करीत आहेत.

Copy