Private Advt

घर उघडे ठेवून झोपल्याची चोरट्यांना संधी : 70 हजारांच्या दागिण्यांवर मारला डल्ला

जळगाव : शहरात चोर्‍यांसह घरफोड्यांमध्ये वाढ झाली असून बंद घरांना चोरट्यांना टार्गेट केले आहे. सावखेडा शिवारातील पोतदार शाळेजवळील शांती नगरात घराचा दरवाजा उघड ठेवून कुटुंब झोपले असताना चोरट्यांनी अलगद घरात प्रवेश करीत रोकड आणि दागिने मिळून 70 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन
कैलास बाबुराव चव्हाण (40, रा.शांतीनगर पोतदार शाळेच्या मागे, सावखेडा शिवार, जळगाव) हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 28 रोजी रात्री कुटुंबातील सदस्य दरवाजा उघडा ठेवून झोपून गेले. या दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातील 60 हजार रुपयांची रोकड आणि 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी कैलास चव्हाण यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिल्याने बुधवार, 29 डिसेंबर रोजी दुपारी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरीलाल पाटील करीत आहे.