Private Advt

घरी नको येऊ म्हटल्याचा राग आल्याने तरुणीला मारहाण : तरुणाविरोधात गुन्हा

जळगाव : ‘घरी नको येत जाऊ’ असे सांगितल्याने तरुणाने तरुणीला शिवीगाळ करीत मारहाण केली. मेहरुण परीसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

घरी न येण्याचे सांगितल्याने राग अनावर
संशयीत समीर कमरोद्दीन शेख हा तरुणीच्या भावाचा मित्र आहे. भाऊ घरी नसतांना समीर हा तरुणीच्या घरी ये-जा करत होता त्यामुळे तरुणीने समीर यास घरी येत जावू नकोस, असे सांगितले असता, गुरुवारी दुपारी तरुणी तिच्या घरासमोर असतांना समीर याने तरुणीला शिवीगाळ करत तिच्या कानशीलात लगावली तसेच धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन समीर कमरोद्दीन शेख याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहेत.