घराबाहेर लावलेली पॅजो रीक्षा मध्यरात्री चेारट्यांनी लांबवली

Thieves hijacked a Pajo rickshaw from Kurhepanache village भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातून चोरट्यांनी 45 हजार रुपये किंमतीची पॅजो रीक्षा लांबवल्याची घटना 26 ते 27 दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसाावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
तक्रारदार बंडू शामराव पाटील (45, क्रांतीचौक, कुर्‍हेपानाचे) यांनी घराबाहेर पॅजो रीक्षा (एम.एच.19 बी.एम.2218) उभी केल्यानंतर चोरट्यांनी 26 ऑक्टोंबरच्या सायंकाळी साडेपाच ते 27 रोजीच्या सकाळी नऊ वाजेदरम्यान केव्हातरी संधी साधून 45 हजार रुपये किंमतीची रीक्षा लांबवली. तपास हवालदार युनूस मुसा शेख करीत आहेत.