घरफोड्याला 17 पर्यंत वाढीव पोलिस कोठडी

0

जळगाव ।जिल्हापेठ परिसरातील ओंकारनगरात चोरट्यांनी घराचा कोयंडा तोडून 27 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयिताला 9 मार्च रोजी अटक केली. तो मू. जे. महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या खोलीत राहत होता. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्याला न्या. के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 17 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत वाढ केली आहे.

त्याच्याकडून पोलिसांनी 3 लाख 96 हजार 667 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ओंकारनगरात बीएसएनलचे निवृत्त कर्मचारी चंद्रकांत दत्तात्रेय पाटील (वय 61) यांच्या घरात . 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान चोरी झाली होती. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने 9 मार्च रोजी पारोळा येथील सराईत घरफोड्या सल्ल्या उर्फ सुनील लक्ष्मण पाटील याला अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठहीची मुदत मंगळवारी संपली. त्याला न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 17 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत वाढ केली आहे.

एलसीबीच्या पथकाने अटक केलेल्या सल्ल्या उर्फ सुनील याने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गु. र. नं. 28/17 ही चोरी तसेच पारोळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गु. र. नं. 21/17 ही चोरी सुद्धा केल्याची कबुली दिली आहे. पोराळा येथील घरफोडीतील 3 लाख 88 हजार 967 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.