घरफोडी करणार्‍यांना स्थानिक गुन्हे शाखेतर्फे अटक

0

जळगाव । विमानतळासमोरून रोहीत तीरथलाल मकडीया यांच्या मकरा गोडावूनमधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 58 हजार 300 रूपये किंमतीचा माल चोरून नेला होता. त्या चोरट्यांचा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शोध घेवून अटक केली आहे. या चोरीत एल.ई.डी. टीव्ही, टॉवर फॅन, होम थिएटर, टिव्ही, डिश, अ‍ॅन्टेना यांचा समावेश होता. अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरीत एल.ई.डी. टीव्हीचा समावेश
या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हा शाखेतर्फे देखील चालु होता. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने संतोष अरूण पाटील रा. एकुलती ता. जामनेर, रविंद्र शिवाजी पाटील रा. कुसुंबा ता. जळगाव मुळ रा. एकुलती ता. जामनेर या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्यची कबुली दिली. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोघांकडून 5 एलईडी टिव्ही, 5 टॉवर फॅन, 5 होम थिएटर, 8 डिश अ‍ॅन्टेना असा एकूण 58 हजार 300 रूपयांचा माल हस्तगत करण्यात केला. पुढील कारवाईसाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्या दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

यांनी केला तपास
ही कारवाई रविवार 12 रोजी स्थागुशाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी गोपनीय माहितीनुसार सपोनि पी.एम. वानखेडे, उत्तमसिंग पाटील, मनोहर देशमुख, सुभाष सुरतसिंग पाटील, पोहेकॉ नारायण पाटील, दिलीप येवले, अशोक चौधरी, चंद्रकांत पाटील, विनयकुमार देसले, पोना बापु पाटील, महेंद्र पाटील, रमेश चौधरी, गफ्फार तडवी, मिलींद सोनवणे, चालक दिपक पाटील, पोकॉ योगेश पाटील, मनोज दुसाने, सुशिल पाटील, प्रविण हिवराळे, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने कारवाई केली.