Private Advt

घरफोडीपूर्वीच जळगावात संशयीत पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : मध्यरात्री घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेल्या एकाला जिल्हापेठ पोलीसानी अटक केली आहे. त्याच्यावर राज्यभरासह मध्यप्रदेशात वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसात गुन्हा दाखल
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सलीम सुभान तडवी व होमगार्ड विनोद ठाकूर हे शनिवारी 16 एप्रिल रोजी रात्री अडीच वाजता गस्त घालीत होते. पेट्रोलिंग करीत असतांना स्टेट बँक आँफ इंडीया शिवकॉलनी शाखेच्या बाजुला असलेल्या भगीरथ कॉलनीतील डॉ. पी.डी. पाटील यांच्या घरासमोर एक इसम संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव रुपसिंग नजरू भिल्ल (50, रा.गर्दावाद, ता.कोकशी, जि.धार, मध्यप्रदेश) असे सांगून तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान, सलीम तडवी यांना संशय आल्याने त्यांनी संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 1 फुट लांबीची टॉमी, मोठा स्क्रू ड्रायव्हर, एक पोपट पान्हा असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.