घरगुती ग्राहकांसह छोट्या व्यावसायीकांचे वीज बिल माफ व्हावे

0

माजी नगरसेवक दीपक धांडे यांची वीज कंपनीकडे मागणी

भुसावळ : घरगुती इलेक्ट्रिक बील तसेच लहान व्यवसाय करणार्‍या व्यापाराचे इलेक्ट्रिक बिल माफ करण्याची मागणी माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी भुसावळ वीज कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लॉकडाऊनमुळे गोर-गरीबांवर उपासमारीची वेळ
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशामध्ये शासनाच्या वतीने लॉक डाऊन करण्यात आले असून त्याचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्रामध्ये बसत आहे कारण सर्वात जास्त कोरोना बाधीत रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे आज सामान्य माणसाला जीवन जगणे असह्य झाले आहे. सर्व लहान-मोठे व्यवसाय बंद पडले असून सर्व लहान व्यवसाय करणार्‍यांचे मार्च , एप्रिल, मे या तीन महिन्याचे इलेक्ट्रिक बिल माफ करावे तसेच लॉक डाऊन मुळे सर्व कंपनी कामगार, बांधकाम कामगार, रीक्षाचालक, ट्रक चालक, आईसक्रीम विक्रेते, बर्फ विक्रेते, गॅरेज व्यावसायीक आदी लहान मोठे कामगार गेल्या 15 दिवसापासून घरीच बसून आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या परीवाराचा उदर निर्वाह करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यात. वीदज कंपनीचे इलेक्ट्रिक बिल भरण्याची वेळ आली तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला महाराष्ट्रातील जनतेचे इलेक्ट्रिक भरण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी करावी व महाराष्ट्र राजाचे ऊर्जा मंत्री यांनी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आपल्या राज्यातील जनतेला मार्च, एप्रिल व मे महिन्याचे घरगुती इलेक्ट्रिक बिल व लहान व्यापाराचे इलेक्ट्रिक बिल माफ करावे व जनतेच्या ह्रदयात कायम स्वरुपी स्थान निर्माण करावे व जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक धांडे, अ‍ॅड. नरेंद्र लोखंडे, सागर वाघोदे, योगेश कोलते यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे व उर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठवण्यात आल्या आहेत.