घरकुलातल्यांना महिन्याचा दिलासा

0

जळगाव । तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात सहभागाचा आरोप असलेल्या नगरसेवकांना त्यांची बाजू मांडता यावी म्हणून आयुक्त जीवन सोनवणे 48 आजी माजी नरसेवकांची 22 व 23 फेब्रुवारी व 27 व 28 फेब्रुवारीला सुनावणी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या नगरसेवकांच्या सुनावणीत आज पहिल्या दिवशी 12 जणांची सुनावणी घेण्यात आली. प्रदिप रायसोनी यांच्यातर्फे अ‍ॅड. गोंविद कन्हैय्यालाल वानखेडे , महेंद्र तंगू सपकाळे यांच्यातर्फे अ‍ॅड. डी. एच. परांजपे यांनी हजेरी लावली होती. या सुनावणीत अफजल खान पटवे, शिवचरण ढंढोरे, अशोक सपकाळे, मंजुळा कदम, लक्ष्मीकांत चौधरी, डिंगबर वाणी, पुष्पा पाटील, देविदास धांडे, शांताराम सपकाळे, इक्बालोद्दीन पिरजादे हे स्वतः हजर झाले होते.

सकाळी दहा वाजताच नगरसेवक हजर
शासनातर्फे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले होते. काही आजी-माजी नगरसेवकांकडून प्रत्येकी 1 कोटी 16 लाख रुपये वसुल करण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती. त्यानुसार ही सुनावणी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चालली. सर्व नगरसेवकांचे वकीलपत्र अ‍ॅड. डी. एच. परांजपे यांनी घेतले. खुलासा देण्यासाठी वकीलांनी 22 मार्चपर्यंतचा अवधी मागून घेतला असता त्यांना अनुमती देण्यात आली आहे. लेखापरीक्षक डी.आर. पाटील, लेखापरीक्षण विभागाचे अनिल बिर्‍हाडे, रविंद्र कदम उपस्थित होते. 23 फेब्रुवारी रोजी सुभ्रदाबाई नाईक, वासुदेव सोनवणे, अलका राणे, विजय वाणी, चंद्रकांत कापसे, चंद्रकांत सोनवणे, सरस्वती कोळी, चुडामण पाटील, अजय जाधव, अशोक परदेशी, कैलास सोनवणे, डिंगबर पाटील यांची सुनावणी होणार आहे.

सर्वांनाच मुदत द्यावी लागणार
27 फेब्रुवारी रोजी दत्तु कोळी, चत्रभुज सोनवणे, भगत बालाणी, अरूण शिरसाळे, मीना मंधान, सुनंदा चांदेलकर, मुमताजबी खान, अलका लढ्ढा, सिंधु कोल्हे, सुधा काळे, साधना कोगटा, विमल पाटील यांची सुनावणी होणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी निर्मला भोसले, लता भोईटे, गुलाबराव देवकर, लिलाधर सरोदे, सदाशिव ढेकळे, विजय कोल्हे, पुष्पलता अत्तरदे, मिना वाणी, रेखा सोनवणे यांचा समोवश आहे. आज पहिल्या सुनावणीत वकीलांना तपशीलवार उत्तर देण्यासाठी महिनाभराची मुदत मिळाल्याने पुढच्या सर्व टप्प्यांमधील नगरसेवकांनाही अशी मुदत मिळू शकते त्यामुळे या सुनावणीची फलनिष्पत्ती स्पष्ट होण्यास अजूनही बराच कालवधी जाऊ शकतो, अशी चर्चा मनपा वर्तुळात होती.

तांत्रीक दृष्ट्या ही सुनावणी विभागीय आयुक्तांनी घेणे गरजेचे होते. परंतु, कोर्टाने दिलेल्या आदेशाचा सन्मान करून आम्ही आमचे मुद्दे आयुक्तांसमोर मांडणार आहे. हुडकोचे 3 कोटी व जेडीसीसी बँकेच 1 कोटी व्याज महानगर पालिकेला प्रत्येक महिन्याला भरावे लागत आहे. यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. यासाठी हेच नगरसेवक जबाबदार आहेत.
-दिपक गुप्ता, सामजिक कार्यकर्ता

मोफत बस सुनावणी 1 मार्च रोजी
त्रयस्त अर्जदार सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी आयुक्तांना भेटून सुनावणीच्या वेळी हजर राहण्याची परवानगी मागीतली आहे. यावेळी गुप्ता यांचे वकील अ‍ॅड. महेश भोकरीकर यांनी त्रयस्त अर्जदाराचा अर्ज सादर केला. दिपककुमार गुप्ता यांनी सुनावणी ही विभागीय आयुक्त घेवू शकतात असा युक्तीवाद केला आहे. घरकुल घोटाळ्या प्रमाणेच मोफत बस घोटाळ्यातील दोषी नगरसेवकांची सुनावणी 1 मार्च ते 4 मार्चला होणार आहे.