घरकुलांचा निधी परत जाण्याचा मार्गावर

0

मुक्ताईनगर। वन अधिकार्‍याच्या मुजोरपणामुळे डोलारखेड्यातील भराडी समाजाच्या 50 लाभार्थ्यांचा घरकुलाचा निधी परत जाण्याचा मार्गावर, घरकुलाचा जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी माजि मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्विय्य सहाय्यक योगेश कोलते, जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, पंचायत समिती सदस्य विलास पाटील यांचा नेतृत्वाखाली डोलारखेडा येथिल भटके नाथजोगी (भराडी) समाजाचा लाभार्थ्यानी तहसिलदारांना निवेदन देवुन मागणी केली.

50 जणांच्या घरकुल प्रस्तावांना मंजुरी
तालुक्यातील डोलारखेडा गाव फॉरेस्टमध्ये वसलेले आहे. तेथे 1941 पासून रहिवाशी असलेल्या भटके नाथ जोगी (भराडी) समाजाचे 50 बांधवांचे पंतप्रधान योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. ते सद्या डोलारखेडा गावात टीना पत्राचा घरात राहत असुन ग्रामपंचायतला त्याचा नावाचा भोगवटा असुन ते नियमाने कर भरतात परंतु फॉरेस्ट अधिकारी ती जागा वनविभागाची असल्याचे सांगत घरकुल बांधु देत नाही. वनविभागातील अधिकार्‍यांच्या आडमुठेपणामुळे गरीब गरजू 50 लाभार्थ्यांचे घरकुल परत जाण्याच्या मार्गावर आहे.

घरकुलासाठी शासनाकडुन जागा उपलब्ध केली जाते असे असताना शासनाचे कर्मचारीच शासनाने मंजुर केलेले घरकुल बांधण्यास विरोध करीत आहे तरी हा जागेचा प्रश्न सोडवावा या मागणीचे निवेदन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्विय्य सहाय्यक योगेश कोलते, जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, पंचायत समिती सदस्य विलास पाटील यांचा नेतृत्वाखाली भटके नाथजोगी (भराडी) समाजबांधवानी दिले.