घंटागाडीतून दारुची वाहतूक; राष्ट्रवादीच्या फरारी नगरसेवकाला अटक

0

इस्लामपूर – कोरोनाबाधित कंटेन्मेंट झोनमधील बिअर बारमधून चोरट्या पद्धतीने दारू काढून त्याची नगरपालिकेच्या कचरा घंटागाडीतून वाहतूक करण्यास प्रोत्साहन देणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक खंडेराव जाधवला रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. जाधव गेल्या १३ दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता.
चोरट्या दारू वाहतुकीविरुद्ध स्थानिक नगरसेवक अमित ओसवाल यांनी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर पवार यांनी कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले होते. याचा राग आल्याने जाधवने मुख्याधिकारी पवार यांच्या केबिनमध्ये घुसून खुर्ची उचलून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर. पवार विरुध्द गुन्हा दाखल झाला होता. तेेंव्हापासून तो फरार होता. १९९० पासून तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न व इतर गुन्हे त्याच्या नावावर आहेत.

Copy