Private Advt

ग.स.सोसायटी निवडणूक : सहकार पॅनलला पटकावल्या सर्वाधिक जागा ; सत्ता मिळवण्यासाठी ‘या’ पॅनलची भूमिका ठरणार महत्वाची

जळगाव : ग.स.सोसायटीच्या 21 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याही पॅनलला बहुमत मिळाले नसून प्रगती पॅनलने शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारल्याने सत्तेची चावी या पॅनलच्या हाती आल्याचे दिसून येत आहे. सहकार पॅनलला सर्वाधीक नऊ जागा मिळाल्या असून बहुमतासाठी आवश्यक असणार्या दोन जागा त्यांना कमी पडल्या आहेत तर त्यांना आव्हान देणार्या लोक सहकार पॅनल व प्रगती पॅनल यांना प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. यामुळे ग.स.सोसायटीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

21 जागांसाठी निवडणूक
ग.स.सोसायटीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. यासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात चुरस दिसून आली. यात 21 जागांसाठी पाच पॅनलच्या माध्यमातून तब्बल 115 उमेदवार उभे असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शनिवार, 30 एप्रिल रोजी कबईचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली. पहिल्यांदा मतमोजणी वेगाने होईल असे मानले जात असताना सुरवात संथ गतीने झाली. मात्र मतमोजणी अगदी पहाटे उशीरापर्यंत चालल्याने अतिशय आळसावलेले वातावरण दिसून आले. यातच विविधफ ेर्‍यांमधून कधी कुणी आघाडीवर तर कुणी पिछाडीवर जात असल्याने थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

त्रिशंकू स्थिती
रात्री आठ वाजेपासूनच ग. स. सोसायटीत त्रिशंकू स्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले. आणि अंतिम निकालातून ही बाब सिध्द झाली. पहाटे चार वाजेच्या सुमारास अंतीम निकाल जाहीर करण्यात आला. यात सहकार पॅनलला सर्वाधीक नऊ जागा तर त्यांना आव्हान देणार्या लोक सहकार पॅनल व प्रगती पॅनल यांना प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. यामुळे ग.स. सोसायटीत त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली आहे.

असे आहेत विजयी उमेदवार-

राखीव- अनुसूचित जात प्रवर्ग- विजय पवार (प्रगती पॅनल), अनुसूचित जमाती/व्हीजेएनटी- ए.टी.पवार (प्रगती पॅनल), ओबीसी राखीव- रावसाहेब मांगो पाटील (प्रगती पॅनल).

महिला राखीव- प्रतिभा सुर्वे (सहकार पॅनल), रागिणी किशोरराव चव्हाण (लोकसहकार पॅनल)

स्थानिक मतदारसंघ- 
उदय मधुकर पाटील (सहकार पॅनल), अजबसिंग पाटील (सहकार पॅनल), सुनील सूर्यवंशी (लोकसहकार पॅनल), मनोज माळी (प्रगती पॅनल), योगेश सनेर (प्रगती पॅनल)

बाहेरील मतदारसंघ- अजय सोमवंशी (लोकसहकार पॅनल), महेश पाटील (सहकार पॅनल), रवींद्र सोनवणे (लोकसहकार पॅनल), भाईदास पाटील (सहकार पॅनल), ज्ञानेश्वर सोनवणे (लोकसहकार पॅनल), योगेश इंगळे (सहकार पॅनल), अनिल गायकवाड (लोकसहकार पॅनल), अजय देशमुख (सहकार पॅनल), विश्वास पाटील (सहकार पॅनल), निलेश पाटील (प्रगती पॅनल ), मंगेश भोईटे (सहकार पॅनल)