ग्रामीण विद्यार्थी शास्त्रज्ञ होणे म्हणजे डॉ.कलामांना खरी श्रद्धांजली

0

भडगाव । आपल्या ग्रामीण भागातुन एखाद्या शास्त्रज्ञ व्हावा म्हणजे स्व. कलामांना आपल्या भागातुन खरी आदरांजली ठरेल , आगामी जग हे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पोषक व संशोधनासाठी अग्रेसर करावे, आपल्या ग्रामीण भागाचे नाव जगभरात कोरण्याची विज्ञान प्रदर्शन ही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असते त्यात सहभागी झाले पाहिजे असे मत कै.कृष्णराव पाटील माध्यमिक शाळेचे चेअरमन तथा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी व्यक्त केले. गट शिक्षण विभाग पंचायत समिती भडगाव व कै. कृष्णराव पाटील माध्यमिक शाळा आंचळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 44 माध्यमिक शाळेचा सहभाग
आंचळगाव येथे एक हजार झाडे लावुन त्यांचे प्रत्यक्ष संवर्धनाचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार असून पहिल्या टप्प्यात 350 रोपांची प्रत्यक्ष लागवड गाव व शाळा परीसरात करण्यात आली असल्याचे डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. यावेळी व्यसपीठावर पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती प्रमोद पाटील, गट शिक्षण अधिकारी बहीरम साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी कुमावत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्ज्वलनाने झाली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी एस.टी.पाटील, डॉ.आर.डी.निकम, चंद्रकांत देसले, प्रमोद पाटील यांनी विज्ञानाची गरज, संधी, ग्रामीण भागातील विद्यार्थी व शैक्षणिक दृष्टिकोन विषयावर मनोगतातून मार्गदर्शन केले. आंचळगाव शाळेचे मुख्याध्यापक नामदेव कृष्णा पाटील यांनी सन 2017 पर्यंत संपूर्ण शाळेचे कामकाज डिजिटल करणार असल्याचे सांगितले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शाळेचे 44, उच्च माध्यमिक चे 38 शिक्षकांच्या 3 विज्ञान उपकरणांची मांडणी करण्यात आली. यावेळी प्रदर्शन कार्यक्रमस्थळी माजी ग.स.सोसायटी अध्यक्ष विलास नेरकर, सोनवणे, सी.जे.पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाल्मिक पाटील यांनी तर आभार सी जे पाटील यांनी मानले.