ग्रामीण रुग्णालयाला खुर्च्या, कपाट, ऑक्सिमीटर भेट

भुसावळातील उपक्रमशील माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांचा मातृदिनी मदतीसाठी पुढाकार

भुसावळ : समाजाचं आपणही देणं लागतो या भावनेतून भुसावळचे माजी नगरसेवक प्रकाश बतरा व त्यांच्या मातोश्री नगरसेविका पुष्पा बतरा यांनी मातृदिनाचे औचित्य साधून रविवार, 9 रोजी चार कपाटांसह, 12 खुर्च्या, तीन पल्स ऑक्सिमीटर भेट दिले. यावेळी आमदार संजय सावकारे उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तालुका व परीसरातील नागरीकांवर उपचार होत असलेतरी संसाधनांची कमतरता असल्याने मदतीचे हात पुढे येत आहेत.

62 हजारांच्या साहित्याची मदत
सुमारे 62 हजार रुपयांच्या या साहित्याचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते वितरण झाले. यावेळी डॉ.भालचंद्र चाकूरकर, डॉ.शुभांगी फेगडे, डॉ.सिद्धेश पाटील, डॉ.वैभव निकम, डॉ.नी.तू.पाटील, भाजप शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, अजय नागराणी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, अमोल महाजन, संदीप सुरवाडे, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, सरचिटणीस नंदकिशोर बडगुजर, रुग्णालय स्टाफ एलियास शेख, गणेश चौधरी, गुलशन वादवाणी आदी उपस्थित होते.

मातृदिनी केलेली मदत कायम स्मरणात : निकी बत्रा
ग्रामीण रुग्णालयातील प्रशासकीय कार्यालयात सुलभता यावी आणि गोरगरिब रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना मदत व्हावी यासाठी साहित्य दिले. रविवारी मातृदिन असल्याने याच दिवशी दिलेला हा मदतीचा हात आयुष्यभर स्मरणात राहील, असे माजी नगरसेवक प्रकाश बतरा म्हणाले.