ग्रामीण भागातील आरोग्याची भिस्त होमिओपॅथीक डॉक्टरांवर

0

शेंदुर्णी। जामनेर तालुक्यात होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने होमिओपॅथीचे जनक डॉ. जम्यूए हनीमन यांच्या वाढदिवसानमित्त होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी उपक्रमांचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष डॉ.सुरेश ओस्तवाल यांचे नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेंदुर्णीच्या पारस भवन येथे आयोजित तालुकास्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.आनंद बारी होते. सुरुवातीला मान्यवरांनी दिपप्रज्ज्वलन व फोटोस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आली. प्रास्ताविक डॉ.अमोल भारुडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.निलमकुमार अग्रवाल, डॉ.देवानंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. यसवंत सूर्यवंशी यांनी केले.

जामनेर तालुक्यात कार्यक्रमांचे आयोजन
यावेळी बोलताना मान्यवरानी सांगितले की, ‘ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर अजूनही शासकीय आरोग्य सेवा पोहचू शकल्या नाहीत. मात्र होमिओपॅथिक डॉक्टर रात्रंदिवस उन्हापावसात तेथे तूटपुज्या मोबदल्यात, उधारीवर आरोग्य सेवा देत आहे. शासनाने त्यांच्या पाटीशी रहावे. शासकीय आरोग्य सेवेत सामावून घ्यावे. अशीही मागणी या निमित्ताने झाली. जामनेरला होमिओपॅथी भवन उभारण्याचे या ठिकाणी ठरले. मोफत आरोग्य शीबीर घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हाअध्यक्ष डॉ.रीतेश पाटिल, डॉ.नीलेश ललवानी, वी.टी.पाटिल, एल.यु.जैन, डॉ.मनोज विसपुते, डॉ.राजमल नवाल, डॉ. युवराज बारी, डॉ.शुक्ला, पं.स.सदस्य डॉ. किरण सुर्यवंशी, डॉ.अजय सुर्वे, डॉ. वीजयानंद कुलकर्णी, डॉ.जी.टी.पाटिल पहूर, एस. के. पाटील, भास्कर पाटील, नाचनखेडा, डॉ.पराग चौधरी फत्तेपूर, डॉ.प्राजक्ता पंडित, डॉ.शोभा पाटिल, जामनेर, तोंडापूर, नेरी, पाळधी, पहूर, वाकोद, नाचनखेडा, शेंदुर्णी येथील डॉक्टर यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.