ग्रामीण जनतेला केंद्रबिंदू मानून कायापालट करणार

0

रावेर । गावाला केंद्र बिंदु माणून ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेचा भाजपा सत्तेच्या माध्यमातून विकास करणार असून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी मेगा रिर्चाज सारखे प्रकल्प भारतीय जनता पक्षाने हाती घेतले आहे. यामध्ये शेती क्षेत्राचा विकास, रस्ते निर्माण, शिक्षण, शिवरस्ते दर्जेदार करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपाचे उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी आयोजित भाजपा उमेद्वारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी केले. याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

उमेदवारांच्या हस्ते करण्यात आला अभिषेक

निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील ओंकारेश्वर येथे भारतीय जनता पक्षाचे प्रचार नारळ फोडण्यात आले. यावेळी खासदार खडसे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे होते. यावेळी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांनी मंदिरात अभिषेक करून उपस्थितांना आपला परिचय करून दिला.

कार्यकर्त्यांनी घेतला पक्षात प्रवेश

जिल्हा यावेळी अनेकांनी भाजपात प्रवेश सुद्धा केला तर अनेक पदाधिकार्‍यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातून मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव नरवाड़े यांनी तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी केले

यांची होती उपस्थिती

जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, मिलिंद वायकोळे, भाजपा सरचिटणीस शिवाजीराव पाटील, महेश चौधरी, जिल्हा परिषद सदस्या कोकिळा पाटील, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, गोपाल नेमाड़े, मिलिंद अवसरमल, नितिन कोळी, सुरेश चिंधु पाटील, दुर्गादास पाटील, रोहिदास ढाके यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.