ग्रामस्थांनीच बांधली नविन स्वच्छतागृह

0

अमळनेर : तालुक्यातील शिरुड येथील नवीन वसाहती भागात पुरुषासाठी स्वच्छतागृह नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे गेल्या 6 ते 7 महिन्यापासून तेथील स्वच्छतागृह पाडण्यात आल्याने नवीन स्वच्छतागृह बांधण्याची मागणी येथील राहिवास्यांनी केली आहे. गेल्या 6 ते 7 महिन्यापूर्वी मंगरुळ ते कावपिंप्री ह्या रस्त्याचे डाबरीकरण व कॉन्क्रीट करण्यासाठी येथे असणारी मुतारी ही पाडण्यात आली होती. ती पाडल्यानंतर ह्या ठिकांणच्या नागरिकांना दूसरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत होती. ह्या परिसरात रहिवासी वस्ती जास्त असल्याने त्याठिकाणी नवीन मुतारीचे बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र वारंवार लेखी व तोंडी मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने आर्थिक निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत फक्त आश्वासन दिल्याने तेथील नागरिकांनी त्याच ठिकाणी मॅट प्लास्टिक गोणी व इतर साहित्याचा वापर करून तात्पूर्ती नवीन मुतारी तयार केली आहे. तरी ग्रा.प. प्रशासनाने याकडे लक्ष घालून लवकरात लवकर नविन मुतारीचे बांधकाम करावे अशी मागणी होत आहे.