ग्रामसेवकांशिवाय गावाचा विकास अशक्य

0

रावेर । ग्रामसेवक ग्रामीण भागाचा विकासाचा कणा असून त्यांच्या शिवाय गावाचा विकासा करणे शक्यच नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले. येथील पंचायत समिती सभागृहात ग्रामसेवकसंघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात महाजन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिति सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील, आत्माराम कोळी, पंचायत समिती सदस्य जुम्मा तड़वी, जितेंद्र पाटील, दिपक पाटील, कविता कोळी, योगेश पाटील, गटविकास अधिकारी सानिया नाकाडे. गोपाळ पाटील माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ नेमाळे, भाजपा सरचिटणिस महेश चौधरी, नरेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.

हे झाले सेवानिवृत्त
ग्रामसेवक पी. आर.पाटील (खिर्डी), जी.एन. पाटील (रोझोदा), वामनराव चौधरी (वाघोड़), पी.एस. जंगले (थोरगव्हान) हे सेवानिवृत्त झाले.

यांची होती उपस्थिती
संघटनाचे अध्यक्ष डी.सी. पाटील, सचिव प्रीतम शिरतुरे, व्ही.आर. महाजन, अरविंद कोलते, महेंद्र दुपटे,सुनील गोसावी, आर,के. मोरे, उषा नाईक, मिना तायड़े, रुबियाना तड़वी, सातव कुंदन कुमावत प्रतिभा तायड़े, शाम पाटील, किरण पाटील, वसावे, सी.व्ही. चौधरी, राजू तड़वी, एस.एस. शिंपी, ग्राम विकास अधिकारी दिलीप तड़वी उपस्थित होते. सूत्रसंचलन उदय चौधरी यांनी केले.