ग्रामपंचायत सदस्याच्या पतीस वस्तार्‍याने केले वार

0

चाळीसगाव : तालुक्यातील हातले येथे ग्रामपंचायत महिला सदस्यांने संडासाची टाकी बांधण्यास मनाई केल्याचे वाईट वाटून 5 जणांनी महिला सदस्यांच्या पतीला शिवीगाळ मारहाण करून दोघांनी वस्तरा व धारदार वस्तूने हाताच्या दंडावर वार करून जखमी केल्याची घटना शुक्रवार 17 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास हातले गावातील हनुमान मंदिर चौकात घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमान मंदिर चौकात केली शिवीगाळ
हातले गावातील मलाकर दयाराम अहिरे, भिकन दयाराम आहिरे, दयाराम बळीराम आहिरे, वैशाली कमलाकर अहिरे, आशाबाई भिकन अहिरे यांना ग्रामपंचयात सदस्य सीमा पिंगळे यांनी संडासाची टाकी बांधण्यास मनाई केली होती. त्याचे त्यांना वाईट वाटून त्यांनी सीमा पिंगळे यांचे पती गोविंदा पिंगळे हे शेतात गुरे घेण्यासाठी जात असतांना हनुमान मंदिर चौकात शिवीगाळ केली. यावेळी कमलाकर दयाराम अहिरे याने गोविंदा पिंगळे यांना हातातील वस्तर्‍याने त्यांच्या उजव्या खाद्यांवर वार केला तर भिकन दयाराम अहिरे याने धारदार वस्तू त्यांच्या दंडावर मारून दुखापत केली. दयाराम बळीराम अहिरे याने गोविंदा पिंगळे यांना पकडून ठेवले तर वैशाली अहिरे व आशाबाई यांनी शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. खमी गोंविदा पिंगळे यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असून पुढील तपास पोलीस नाईक किशोर सोनवणे करीत आहेत.