ग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी

0

जळगाव: जिल्ह्यातील ७८३ पैकी ६८७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व राखले आहे. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सरशी घेतली असून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप पुरस्कृत पॅनेलचा बहुतांश ठिकाणी विजय झाला आहे तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचा पराभव झाला आहे.

जामनेर तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीत जोरदार टक्कर

माजी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने जोरदार टक्कर दिली आहे. काही ठिकाणी मुसंडी मारली आहे. मात्र पहूर, पाळधी, नाचणखेडा, टाकरखेडा गाडेगाव येथे भाजपने मोठा विजय प्राप्त केला आहे.

तालुक्यातील निकाल पुढील प्रमाणे-
तोंडापूर राष्ट्रवादी 13 भाजप 4, फत्तेपूर राष्ट्रवादी 6 भाजप 11,पहूर कसबे -राष्ट्रवादी 5 शिवसेना 01, भाजप 9, अपक्ष 2, वाकोद राष्ट्रवादी 9 भाजप 8, पाळधी भाजप 11 राष्ट्रवादी 4, नाचणखेडा राष्ट्रवादी 3 भाजप 13, गाडेगाव भाजप 6, राष्ट्रवादी 3, टाकरखेडा भाजप 4, राष्ट्रवादी 3, केकत निंभोरा भाजपा 5 राष्ट्रवादी 6, मांडवे बुद्रुक राष्ट्रवादी 4 भाजप 3 अपक्ष 2

Copy