ग्रामपंचायत निधीतून अपंगांना मिक्सरचे वाटप

0

अमळनेर। कळमसरे येथील ग्रामपंचायत कार्यालयात 1 मे रोजी ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून अपंगाना मिक्सर वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीने 32 हजार 500 रुपयांचा स्वनिधीतून गावातील 20 अपंग लाभार्थीना मिक्सर वाटप केले. यावेळी सरपंच कल्पना पवार, उपसरपंच मुरलीधर महाजन यांच्याहस्ते अपंग बांधवाना मिक्सर वाटप केले गेले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र राजपूत, अशोक चौधरी, आबा महाजन, कमलबाई कुंभार, सुनंदा चौधरी, यशोदा निकम, मालती चौधरी, चिंधाबाई चव्हाण, छाया मिस्तरी, ग्रामविकास अधिकारी एस. डी.सोनवणे यांची प्रमुख उपस्थिति होती.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
तालुक्यात प्रथमच अपंगाना मिक्सर वाटप कळमसरे ग्रामपंचायतीने केले आहे. मागील वर्षीही अपंग बांधवाना सायकल वाटप व कुबड्या वाटप करण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायत स्वनिधीतून अपंगाना मिक्सर वाटप करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रदीप महाजन, शरद चौधरी, योगेन्द्र राजपूत, योगश गुरव यांनी परिश्रम घेतले. गावातील अपंग, गरजूना मिक्सर वाटप करण्यात आल्याने गावातून समाधान व्यक्त होत आहे.