ग्रामपंचायतीच्या 7213 जागांसाठी 13 हजार 847 उमेदवार रिंगणात

0

जिल्ह्यात 2003 उमेदवार बिनविरोध ; जिल्ह्यात 2415 मतदान केंद्र

जळगाव: जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. ग्रामंपचायतीच्या 7213 जागांसाठी जिल्ह्यात माघारी अंती 13 हजार 847 उमेदवार रिंगणात आहेत. तर 2003 उमेदवार हे बिनविरोध झाले आहेत. या निवडणुकीसाठी 2415 मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 783 ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. 7213 जागांसाठी 20 हजार 264 अर्ज प्राप्त झाले होते. माघारीच्या प्रक्रियेत एकुण 6129 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. तर आता 13 हजार 847 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य आजमावत आहेत. जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींपैकी 92 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले.

बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या
जळगाव तालुक्यात 2, जामनेर 3, एरंडोल 8, धरणगाव 9, भुसावळ 2, यावल 1, मुक्ताईनगर 4, बोदवड 2, अमळनेर 15, पारोळा 12, चोपडा 10, पाचोरा 11, भडगाव 4 आणि चाळीसगाव तालुक्यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एकुण 92 ग्रामपंचायतीमधुन 2003 उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील डिकसई आणि मोहाडी ह्या दोन ग्रामपंचायती पुर्णत: बिनविरोध झाल्या आहेत.

असे आहेत रिंगणातील उमेदवार
जळगाव – 1024 (463), जामनेर – 1396 (705), धरणगाव 791 (403), एरंडोल 616 (333), पारोळा 860 (506), भुसावळ 646 (280), मुक्ताईनगर 853 (453), बोदवड 449 (237), यावल 990 (469), रावेर 891 (452), अमळनेर 902 (543), चोपडा 874 (482), पाचोरा 1625 (844), भडगाव 547 (309), चाळीसगाव 1383 (734) असे उमेदवार रिंगणात आहेत.

जिल्ह्यात 2415 मतदान केंद्र निश्‍चीत
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 2415 मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले आहे. एका केंद्रावर साधारणत: 800 मतदारांना मतदान करता येणार आहेत. मतदान केंद्रांमध्ये जळगाव 170, जामनेर 236, धरणगाव 122, भडगाव 99, रावेर 165, यावल 179, बोदवड 80, अमळनेर 154, पाचोरा 295, भुसावळ 118, एरंडोल 118, पारोळा 130, चाळीसगाव 237, मुक्ताईनगर 151, चोपडा 161 असे एकुण 2415 मतदान केंद्र आहेत.

Copy