गौणखनिजाची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

0

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालयाच्या वतीने कारवाई ः महावितरणचे साघीत्य घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरवरही कारवाई


जळगाव – शहरात अवैधरित्या गौण खनिजची वाहतूक बंद असताना देखील मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेच्या शहरात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करुन दोन्ही ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे गेल्या ५ ते ६ दिवसांपासून कारवाईची मोहीम सुरु केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात पंपिंग रोड दरम्यान मंगळवारी दोन ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या खडी वाहून नेणार्‍या वाहनांची चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे आढळून आले कागदपत्रे नसल्यामुळे दोन्ही वाहनांवर कारवाई करण्यात आली. दोन्हीही ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

याचवेळी महावितरण कंपनीचे काम करण्यासाठी लागणार्‍या सामानासह एका ट्रॅक्टरला देखील पकडले आहे. दरम्यान ट्रॅक्टर वरील कर्मचार्‍यांच्या माहितीनुसार एमएससीबी ने परवानगीनुसार कामासाठी लागणारे वाळू या ट्रॅक्टरमध्ये ते ट्रॅक्टर देखील जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले असून कागदपत्रांची चौकशी सुरू आहे.

या तीन वाहनांवर केली कारवाई

एमएच 15 इएस 3055 व त्याचे विना नंबरचे ट्रॉली यामध्ये महावितरण कंपनीच्या कामासाठी लागणारे सामान विद्युत तारा आणि काही वाळू आढळून आली, एमएच 19 बीजी 2981 व त्याचे ट्रॉली क्र. एमएच 19 सीवाय 2991, आणि एमएच 19 सी 4665 त्याचे ट्रॉली क्रमांक एमएच 19 पी 5092 यादो की ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या खडी वाहून नेत असतांना पकडण्यात आले. जळगाव मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, अव्वल कारकून अतुल सानप, लिपिक जगदीश धमाले, जळगाव शहर तलाठी वडनेरे आप्पा, तलाठी वंजारी, तलाठी भोळे, सुधाकर पाटील यांच्यासह इतर कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Copy