गोसेवा गृपच्या तरुणांनी बुजविले खड्डे

0

भुसावळ : शहरातील नाहाटा महाविद्यालय चौफुलीपासून ते रेणुकामाता मंदिर, उड्डाणपुलापर्यंत महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे येथील गोसेवा गृपतर्फे या खड्ड्यांमध्ये भराव टाकून ते बुजविण्यात आले. या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्डे चुकवितांना समोरील वाहनाकडे दुर्लक्ष होत असल्याने मार्गावर अपघात होत असतात.

स्वखर्चातून केले काम
याबाबत लोकप्रतिनिधीदेखील उदासिन असल्यामुळे गोसेवा गृपच्या सदस्यांनी स्वखर्चाने खड्ड्यांमध्ये भराव टाकून ते बुजविले व पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. यामध्ये रोहित महाले, सिध्दार्थ नवघरे, कृष्णा मिस्तरी, कृष्णा अहिरे, के.पी. पाटील, आकाश शिंदे, रोशन बागुल, गणेश खंडारे आदींचा सहभाग होता.