Private Advt

गोळीबार करणार्‍या दरोडेखोरांवर कठोर कारवाई करावी

भुसावळात खाटीक समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन

भुसावळ : मालेगावजवळ दरोडेखोरांनी गुरुवार, 8 जुलै रोजी पहाटे तीन वाजता केलेल्या गोळीबारात जळगाव येथील व्यापारी शेख जावेद शेख रज्जाक खाटीक (वय 40, रा. शनिपेठ) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शेख जावेद यांचा नाहक बळी गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांना पकडून कठोर कारवाई करावी, अशी मागणी खाटीक समाज बांधवांतर्फे करण्यात आली. या संदर्भात तहसीलदार दीपक धीवरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हाजी रफीक मंगू खाटीक, रमजान मोहम्मद खाटीक, अजिज खाटीक, रोशन खाटीक,शफि खाटीक,सद्दाम खाटीक, अ. रहीम खाटीक,हारून गनी खाटीक,रमजान खाटीक आदी समाज बांधव उपस्थित होते.