‘गोल्डमॅन’ बप्पी लहरी झाले ६६ वर्षांचे

0

मुंबई : बॉलिवूडचा गोल्डन सिंगर आणि सर्वांना डिस्को डान्सवर थिरकायला लावणारा बप्पी लहरी यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. बप्पी लहरीने संगीत जगाला अनेक सुपरहिट गाणे दिले आहेत. हिंदी आणि बंगाली चित्रपटांना त्यांनी आवाज दिला आहे. आता त्यांनी मराठीत एन्ट्री केली असून त्यांनी ‘लकी’ चित्रपटातील एका गाण्याचे रेकॉर्डिंग केले आहे.

बप्पी लहरी यांचा जन्म १९५२ साली कोलकाता येथे झाला होता. त्यांनी ७० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि ८० च्या दशकात ते प्रसिद्ध झाले. बप्पी लहरींचे ‘बंबई से आया मेरा दोस्त’, ‘आय एम ए डिस्को डान्सर’, ‘जूबी-जूबी’, ‘याद आ रहा है तेरा प्यार’, ‘यार बिना चैन कहां रे’, ‘तम्मा तम्मा लोगे’ सारखे सुपरहिट गाणं आजही लोक गुणगुणत असतात.

बप्पी नेहमी गोल्ड घालून असतात. म्हणून त्यांना ‘गोल्डमॅन’ म्हणूनही ओळखले जाते. बप्पी एवढं सोनं का घालतात? असा प्रश्न चाहत्यांना असतो. मात्र, याचा त्यांनी एका कार्यक्रमात खुलासा केला होता. अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रिस्ली सोन्याचे दागिने घालायचा. बप्पी त्याचे मोठे चाहते होते. आयुष्यात यशस्वी झाल्यास मी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेन असे मला वाटत होते आणि देवाच्या कृपेने मी तसे करू शकलो. आधी मी हे केवळ दिखावा करण्यासाठी करत आहे असे लोक म्हणत. पण तसे नाही. सोने माझ्यासाठी लकी आहे, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

Copy