गोलाणी मार्केट परिसरातून मोटारसायकल लांबवली

जळगाव – गोलाणी मार्केट परिसरातून चोरट्यांनी एक मोटारसायकल लांबवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धनंजय भरत निकम (वय २१, रा. प्रिया ट्रेडिंग कंपनी, जुना मेहरुण रोड) हा तरुण २ जून रोजी दुपारी १२ वाजता गोलाणी मार्केट परिसरात आल. त्याने मोटारसायकल (क्र.एमएच १९ बीके ३९१५) गोलाणी मार्केट परिसरात गायत्री फुल भांडारजवळ लावली. काही वेळाने काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाला असता गायत्री फुल भांडारजवळ दिसून आली नाही. याबाबत धनंजय निकम यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहेत.