गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकी लंपास

0

जळगाव । शहरातील मासुमवाडीत राहणार्‍या मजुराने त्याची मोटारसायकल गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिरासमोर लावली असता अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मासुमवाडी परिसरात राहणारा ईस्माईलखान मोहम्मदखान हे 2 जानेवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रोजी गोलाणी मार्केट येथे कामानिमित्त आले होते. त्यामुळे त्यांनी मार्केट परिसरातील पार्कींगमध्ये त्याच्या मालकीची असलेली हिरोहोंडा स्प्लेंड प्लस (क्र.एमएच.19.एबी.686) ही उभी केली होती. काम आटोपून आल्यानंतर त्यांना दुचाकी दिसून आली नाही. परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता मिळून न आल्यामुळे चोरी झाल्याची त्यांना खात्री झाली. याप्रकरणी आज ईस्माईलखान मोहम्मद खान यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय सतिष सुरडकर करीत आहेत.